1) संस्थेच्या सन 2000-01 च्या वार्षिक अहवालास महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशनचा कोल्हापूर विभागातून दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.

2) पैसा फंड शेतकी सहकारी बँका लि. हुपरी यानी प्रवर्तीत केलेल्या लोकसेवक आप्पासाहेब बळवंत माईक सार्वजनिक विश्वस्त निधी या संस्थेने या संस्थेस सन 2002-03 मधील आदर्श सहकारी संस्था म्हणून दि. 20/12/2002 रोजी गौरविले.

3) राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधक संस्था, वर्षा यांचेवतीने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था वार्षिक अहवाल सन 2003-04 या वर्षांसाठी मुल्यमापन स्पर्धेमध्ये संस्थेस सन्मान प्रशस्तीपत्र मिळाले.

4) पैसा फंड शेतकी सहकारी बैंक लि. हुपरी यानी दि. 20/12/2004 प्रवर्तत केलेल्या लोकसेवक आप्पासाहेब बळवंत नाईक सावर्जनिक विश्वस्त निधी हुपरी व ए. एस्. प्रतिष्ठान, कोल्हापूर या संस्थेने मा. पा. पा. पाटील यांना आदर्श व्यवस्थापक पुरस्कार मे सन्मानित केले आहे.

5) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांनी महाराष्ट्रातील पत संस्थाचे 31 जानेवारी 2005 रोजी सांपत्तिक स्थितीचा प्रायोगिक स्वरूपात आढावा घेतला असता आमच्या संस्थेस महाराष्ट्रातील 28000 सहकारी पतसंस्थेमध्ये 14 वा क्रमांक

6) राष्ट्रीय विचारधारा व लोकसेवा फाऊंडेशन जयप्रकाश खादी ग्रामोद्योग मांडार जयसिंगपूर यांच्याकडून सन 2005 या साली आलेल्या महापुरात संस्थेने दिलेल्या अनमोल सेवा बजावली त्या उत्कष्ट कार्याबद्दल 15 अगष्ट 2005 स्वातंत्र्य दिनी संस्थेचा सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ तहसिल जयसिंगपूर यांच्या वतीने सहकार शताब्दी समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेस आदर्श व्यवस्थापन असलेली संस्था म्हणून दि. 5/3/2008 रोजी सहकार विभागामार्फत गौरविण्यात आली आहे.

7) ए.एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्याकडून संस्थेचे चेअरमन मा. भूपाल निरमल यांना सन 2012 या साली आदर्श चेअरमन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

8) बिझनेस एक्सप्रेस श्री फांडेशन, सांगली च्यावतीने राज्यस्तरीय (आदर्श पतसंस्था ) विशेष सेवा पुरस्कार 2012 हा बहुमान दि. 19/05/2013 रोजी मिळाला आहे.

9) सहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्था मर्या. कराड यांच्याकडून दि. 27/4/2014 रोजी सिक्कीमचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते आदर्श संस्था म्हणून गौरविले आहे.

10) सहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्था मर्यादित, कराड यांच्यावतीने सहकार भारतीच्या गोवा येथे झालेल्या अधिवेशनात राष्ट्रीय स्तरावरील आदर्श संस्था म्हणून गौरवीले. दि. 2/11/2014 अवि पब्लीकेशन व गॅलक्झी इन्ना सिस्टीम प्रा. लि. यांच्या वतीने महाबळेश्वर येथे बैंकों पतसंस्था पुरस्कार 2014 संपन्न झाला. त्यामध्ये मल्टिस्टेट पतसंस्था ठेवी रु. 50 कोटीपेक्षा जास्त विभागात द्वित्तीय क्रमांक मिळाला आहे

11) अवि पब्लीकेशन व गॅलक्झी इन्सा सिस्टीम प्रा. लि यांच्या वतीने गोवा येथे बँको पतसंस्था पुरस्कार 2015 संपन्न झाला. त्यामध्ये मल्टिस्टेट पतसंस्था ठेवी रु. 50 कोटीपेक्षा जास्त विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे

12) ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांच्याकडून आदर्श सहकारी संस्था 2015 हा पुरस्कार मिळाला आहे. सन 2015-16 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई याच्याकडून मल्टिस्टेट विभागात संस्थेस दिपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे.