स्व. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे
स्व. श्री . डॉ. धनंजय गुंडे
स्व. श्री. एन.जे. पाटील

         विर सेवा दल

           संकल्पना, संचालन, व्यवस्थापन, उपक्रम

        वीर सेवा दल ही दक्षिण भारत जैन सभेची सशक्त शाखा आहे. वीर सेवा दल फक्त एक युवक संघटन नाही तर आध्यात्मिक व विधायक विचारांची धारा आहे. या संघटने मार्फत समाजामध्ये व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, व्यक्तीमत्व विकास, अशी कामे केली जातात. वीर सेवा दलामार्फत संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी व लहान मुलांच्या मनात अहिंसा, भारतीय संस्कृती व राष्ट्रप्रेम यासारख्या मुल्यांची जोपासना व्हावी यासाठी पाठशाळा चालवल्या जातात. वीरशिरोमणी, वीराचार्य बाबासाहेब श्रीपाल कुचनुरे आजन्म ब्रम्हचारी व्रत धारण करून या वीर सेवा दल संघटनेचे कार्य आजीवन केले आणि संघटना सशक्त बनवली. स्व.डॉ.धनंजय गुंडे प्रस्तावित व स्व.डॉ . एन .जे. पाटील अनुमोदित दक्षिण भारत जैन सभेची ही संघटना समाजाचे भूषण आहे.

        वीर सेवा दल संघटने मार्फत गेली ३६ वर्षे पर्यावरण संरक्षण, शाकाहार प्रचार, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे समाजउपयोगी कार्य महाराष्ट् व कर्नाटक राज्यात करत आहे. वीर सेवा दलाच्या आज पर्यंत २१० शाखा कार्यरत आहेत. व या शाखांच्या अनुषंगाने ११ हजार वीर सेवा दलाचे सदस्य कार्यरत आहेत. वीर सेवा दलाचे सर्व सदस्य व पदाधिकारी हे निर्व्यसनी व सदाचारी आहेत. समाज्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये वीर सेवा दल नेहमी मदतीस अग्रस्थानी असतो. महापूर, दुष्काळ, कोरानासारख्या महामारीच्या काळात वीर सेवा दल समाज्याच्या मदतीला नेहमी अग्रेसर राहिलेला आहे. वीर सेवा दलाचा मुख्य उद्धेश हा तरुणांच्या व्यक्तिमत्वाचा विकास, शाकाहार, निर्व्यसनी समाज आणि प्रदूषण मुक्त पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आहे.

शब्दांकन :- एन . जे . पाटील

संचालक

कर्मवीर मल्टीस्टेट ,जयसिंगपूर

          १] श्रीमती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे
          २] वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे विद्यामंदिर सावळवाडी
          ३] वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे ITI सांगली
          ४] चिंचवाड हायस्कूल चिंचवाड
१] कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को.ऑप. पतसंस्था जयसिंगपूर
२] विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सह.पतसंस्था सांगली
३] शांतीसागर क्रेडीट सोहर्द, शिरगुप्पी
१] आजपर्यंत ७५००० धार्मिक पुस्तकांचे प्रकाशन
२] प्रत्येक वर्षी कॅलेंडर व प्रत्येक महिन्याला संघटनेच्या मासिक प्रसिध्द होते.
३] अनेक गावात व शहरात संघटने मार्फत वाचनालये चालवली जातात.