• Welcome to Karmaveer Multistate, Jaysingpur karmaveer.ho@gmail.com Mon-Sat 10:30am-5:30pm
Karmaveer Bhaurao Patil Multistate Co Operative Credit Society Limited, Jaysingpur
Loan Products
कर्मवीर बद्दल

कर्मवीर बद्दल

आमच्या संस्थेची प्रेरणादायी आणि प्रगतीचा प्रवास

आमच्या संस्थेविषयी

कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपुर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत ०१ जून १९८८ रोजी स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेत वीर सेवा दल संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लगतच्या कर्नाटक राज्यात शाखा विस्तार करण्यासाठी ०४ एप्रिल २०१३ रोजी बहुराज्य सहकारी कायदा २००२ अंतर्गत परिवर्तित झाली.

आज संस्थेच्या ३५ शाखा कार्यरत असून सभासद संख्या ७५,००० हून अधिक आहे. संस्था १३ कोटी ३४ लाख स्वभांडवल आणि ७६ कोटी १० लाख स्वनिधी अशा मजबूत पायावर उभी असून, एकत्रित व्यवसाय ११३२ कोटी आहे. ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी सर्व शाखा कोअर बँकिंग सिस्टमशी जोडलेल्या आहेत.

आधुनिक सोयीसाठी संस्थेमार्फत RTGS / NEFT / IMPS सारख्या वेगवान सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हे सर्व व्यवहार संस्थेच्या मोबाईल अँपद्वारे वापरण्याची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. आपणा सर्वांनी दिलेला विश्वास, सहकार, प्रेरणा आणि सर्व नियम व कायद्यांचे सावधगिरीने पालन करून संस्थेने स्वीकारलेला शिस्तबद्ध मार्ग यामुळे संस्था जबरदस्त प्रगती साध्य करीत आहे.